मुंबई\ ऑनलाईन टीम
पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडीच काम राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे आणि दिलीप मोहिते करत आहेत, अशी टीका काल शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली होती. त्यावरुन आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली बाजू मांडली आहे. महाविकास आघाडी सरकार सक्षम आणि भक्कम असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार चांगलं काम करत आहे. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे त्यामुळे त्या विधानाची सरकारशी कोणताही संबंध लावण्याची गरज वाटत नाही.राज्य सरकारमधील समतोल बिघडलेला नाही. सगळे नेते समन्वयाने काम करत आहेत. संजय राऊत यांनीही सांगितले आहे की, महाविकास आघाडीचे सरकार सक्षम आणि भक्कम आहे. यामुळे हे सरकार भविष्यासाठी आदर्श ठरेल.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कायमच आदर आहे. पण त्यांचं नाव घेऊन स्थानिक पातळीवर जर मित्रपक्षांवर टीका होत असेल तर टीका करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्राला महाविकास आघाडीचं सरकार दिलं आहे. त्याला कोणी स्वार्थासाठी नख लावू नये. माझ्या विधानाची अकारण खूप मोठी चर्चा झाली. महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर आहे हे दाखवून देण्यासाठी काही शक्ती फार उत्सुक आहेत हेच यातून समोर येत आहे. पण हा मुद्दा स्थानिक पातळीवरचा आहे. थोडंफार भांड्याला भांडं लागणं स्वाभाविक आहे.
स्थानिक पातळीवर शिवेसनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी टीका केली होती त्यावर अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे. माणूस ज्या भाषेत टीका करतो त्या भाषेवरुन त्याची संस्कृती कळत असते. या विषयी वैयक्तिक बाबत टीका करण्याचे स्वारस्य नाही. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कटीबद्ध आहे. संसदेतील कामगिरी त्याच्यावर नजर टाकली तसेच शिरुर मतदारसंघातील केंद्र सरकारच्या आखत्यारितीमधील काम लोकांना माहिती आहेत. शिरुर मतदारसंघाचं नाव वेगळ्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चेसाठी आणि टीकेसाठी आणायचे नाही यामुळे त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार नाही असे वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
अमोल कोल्हे काय म्हणाले होते ?
माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आमच्या मनात आदर आहे. संसदेत महाराष्ट्राची, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांची बाजू कोण मांडतं? हे पण तुम्हाला समजून जाईल. माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल. हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल. तर माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत. कारण आदरणीय शरद पवारांच्या आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे ही गोष्ट विसरू नये. महाराष्ट्राचा सरकार हे राज्याच्या हितासाठी आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्याला कुणी नख लावण्याचा प्रयत्न करू नये, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








