कुर्डुवाडी / प्रतिनिधी
गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या प्रकरणातील चार सराईत आरोपींनी माढा सबजेल मध्ये एकाला फिट आल्याचा बनाव करुन पलायन केले. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास माढा येथील सबजेल मध्ये घडली. माढा सबजेल मधून बनावट चलनी नोटा प्रकरणातील सिध्देश्वर शिवाजी केचे ,बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे यामधील अकबर सिध्दाप्पा पवार, खून प्रकरणातील आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर , पाक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असलेला तानाजी नागनाथ लोकरे अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपी अकबर पवार यास फीट येत असल्याचा बहाणा करुन आरोपींनी ड्युटीवरील अंमलदारास सांगितले . त्याला उपचारासाठी जेलच्या बाहेर काढत असताना संधी मिळताच आरोपी पोलिसांना धक्का मारून पलायन करण्यात यशस्वी झाले. यामुळे तेथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत .
यातील दोन आरोपी हे कुर्डुवाडी पोलिस ठाण्याकडील गुन्ह्यांतील तर दोन आरोपी हे टेंभूर्णी पोलिस ठाण्याकडील गुन्ह्यांमधील आहेत. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करीत आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









