ऑनलाईन टीम / मुंबई :
शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात ईडीच्या रडावर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या गायब आहेत. त्यांचा फोनही नॉट रिचेबल येत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांची 4 कोटींची मालमत्ता जप्त केल्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. अटकेच्या भीतीनेच ते गायब झाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
ईडीने तीन वेळा समन्स बजावूनही देशमुख चौकशीला गैरहजर राहिले. त्यामुळे रविवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या नागपूरातील घरावर छापेमारी केली. तसेच नागपुरातील काही ठिकाणी त्यांनी देशमुखांचा शोध घेतला. मात्र, देशमुखांचा तपास लागला नाही. त्यांचा फोनही नॉट रिचेबल असल्याने त्यांचा तपास करणे कठीण झाले आहे.








