प्रतिनिधी/ बेळगाव
हिडकल पाणी योजनेच्या तुम्मरगुद्दी आणि कुंदरगी पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा सोमवार दि. 19 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. हेस्कॉमच्या दुरुस्तीच्या कामामुळे विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याने शहराला पाणीपुरवठा करता येणार नाही. त्यामुळे दि. 19 रोजी चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसह शहरातील संपूर्ण भागातील पाणीपुरवठय़ात व्यत्यय येणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱया हिडकल पाणीपुरवठा योजनेतील दोन्ही पंप हाऊसचा विद्युत पुरवठा बंद होणार असल्याने हिडकल जलाशयामधून करण्यात येणारा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. त्यामुळे शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करणे अशक्मय आहे. परिणामी पाणीपुरवठय़ात व्यत्यय येणार असल्याने शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन एल ऍण्ड टी कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.









