रविवार दि.18 ते शनिवार दि.24 जुलै 2021
मेष
या सप्ताहात सिंहेत मंगळ प्रवेश, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात क्षुल्लक वाद होईल. फायदा होईल. तुम्ही उतावळेपणाने वागू नका. प्रवासात घाई करू नका. नोकरीत कामाचा ताण सप्ताहाच्या शेवटी कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात सर्वांच्या विचारानुसार निर्णय घ्या. तुमच्यावर अपयशाचे खापर फोडण्याचा प्रयत्न होईल. घरातील व्यक्ती मदत करतील.
वृषभ
या सप्ताहात सिंहेत मंगळ, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहात राग वाढेल. कुरकुर करू नका. तुमच्या धंद्यात किरकोळ अडचण येईल. अरेरावी करू नका. नोकरीत कायद्यानुसार प्रश्न सोडवा. राजकीय, सामाजिक कार्यात चोहोबाजूने दडपण येईल. विरोधक हल्लाबोल करतील. प्रकृतीची काळजी घ्या. प्रेमाच्या व्यक्ती मदत करतील.
मिथुन
या सप्ताहात सिंहेत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात फायदा होईल. शेअर्समध्ये योग्य सल्ल्यानुसार गुंतवणूक करता येईल. नवीन परिचयातून नवे काम मिळेल. उत्साह वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात सावधपणे निर्णय घ्या. प्रति÷ा वाचवता येईल. विरोधक क्षुल्लक संधी घेऊन मोठा तणाव निर्माण करतील. मैत्री वाढेल.
कर्क
या सप्ताहात सिंहेत मंगळ प्रवेश, सूर्य, गुरु षडाष्टक योग होत आहे. बोलतांना ताळमेळ ठेवा. कायदा पाळा. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखावी लागेल. धंद्यात फायदा होईल. संयम सोडू नका. राजकीय, सामाजिक कार्यात लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रति÷ा मिळेल. संसारात मुलांच्या संबंधी प्रश्न सोडवाल.
सिंह
या सप्ताहात तुमच्या राशीत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात लक्ष द्या. नोकरांच्यावर अरेरावी करू नका. नोकरी टिकवा. वरि÷ांना कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक कार्यात निर्णय घेताना कोणतीही चूक करू नका. राग वाढवणारे लोक जवळ असतील. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या.
कन्या
या सप्ताहात सिंहेत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात लोभ ठेवू नका. कमी होणारा फायदा सहन करावा लागेल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना मदत करण्याची जबाबदारी तुमच्याकडे येईल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने कामे पूर्ण करा. लोकांना दिलेला शब्द पाळणे सोपे नसते. संसारात खर्च वाढेल. व्यसन नको.
तुळ
या सप्ताहात सिंहेत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. संततीच्या सहाय्याने कठीण कामे करून घेण्यात यश मिळेल. धंद्यात जम बसेल. जुना व्यवहार पूर्ण करा. नवे कंत्राट मिळवण्यात यश मिळेल. नोकरी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कार्याचा ठसा उमटेल. लोकांच्या मनात स्थान निर्माण करता येईल. तुमच्या मनातील अपेक्षा पूर्ण करू शकाल.
वृश्चिक
या सप्ताहात सिंहेत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील अडचणी दूर करता येतील. ओळखीतून नव्या कामाचा व्यवहार ठरवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात चूक सुधारता येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कायद्याच्या विरोधात जाऊन मत मांडू नका. संसारातील कमी भरून काढा.
धनू
या सप्ताहात सिंहेत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात चर्चा सफल करता येईल. मोठय़ा लोकांच्या मदतीची अपेक्षा ठेवू नका. नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर टीका होईल. आरोप येईल. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. संसारातील व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. नोकरी टिकवा.
मकर
या सप्ताहात सिंहेत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. रागावर ताबा ठेवा. गोड बोलून तुम्हाला फसवण्याचा, चिड आणण्याचा प्रयत्न समोरची व्यक्ती करेल. मोह ठेवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात सावधपणे निर्णय घ्या. विरोधकांना कमी समजू नका. व्यसन नको. खाण्याची काळजी घ्या. वाद वाढवू नका.
कुंभ
या सप्ताहात सिंहेत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. अरेरावीची वागणूक ठेवल्यास समस्या वाढेल. वसुली करा. नोकरीत कायद्याचे स्मरण ठेवा. चूक करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामावर, योजनेवर परिणाम होईल. तुमचे मुद्दे निकामी ठरवले जातील. प्रवासात सावध रहा.
मीन
या सप्ताहात सिंहेत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कामाला विरोध होईल. संसारात तणाव होईल. धंद्यात गोड बोला. कायदा पाळा. नोकरीतील कामे वाढतींल. राजकीय, सामाजिक कार्यात नवे काम कराल. लोकांच्या विरोधात जाऊ नका. मैत्रीत गैरसमज होईल. व्यसन टाळाच.





