बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते यावेळी पक्षतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे. दरम्यान आज येडियुरप्पा यांनी नवी दिल्ली येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.
दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि येडियुरप्पा यांच्या भेटीमध्ये २०२३ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कर्नाटकात पक्षाची ताकद अधिक बळकट करण्यासह विविध बाबींवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
दिल्ली भेटी दरम्यान मुख्यमंत्री नेतृत्वदलाच्या मुद्द्यासह ३४ सदस्यांच्या मंत्रिमंडळात सध्या एक जागा रिक्त आहे, पण असे म्हटले जाते की येडियुरप्पा मोदींप्रमाणे मंत्रिमंडळातील जुने चेहरे हटवून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहेत. याविषयीहि त्यांनी चर्चा केल्याची शक्यता आहे.#karnataka