प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीट दर कमी झाल्याने सोमवारपासून अनलॉक होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संकेत दिले आहेत. आरोग्यमंत्री टोपे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरु करण्याच्या मागणीसाठी मंत्री टोपे यांची भेट घेतली असता त्यांनी अनलॉकचे संकेत दिले.
कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांनी आरोग्यमंत्र्याची भेट घेऊन दुकाने सुरु करण्याची मागणी केली. यावर मंत्री टोपे यांनी व्यापा-यांना दुकाने सुरु करण्याबाबतचा आदेश लवकरच काढला जाईल असे आश्वासन दिले. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या दुकाने सोमवारी खूली होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
काल, गुरुवारीच केंद्रीय पथक कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी कोल्हापूरची कोरोना परिस्थिती गंभीर नसल्याचे सांगितले होते.
Previous Articleसोलापूर : महेश कोठे, तौफिक शेख यांना राष्ट्रवादीचा दणका
Next Article गोव्यातून येणाऱयांची कणकुंबीत तपासणी









