काकतीनजीक राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
चार महिन्यांपूर्वी काकतीनजीक एका ट्रकने विद्युत टॉवरला धडक दिली होती. यामुळे उच्च विद्युत वाहिन्या असलेला हा टॉवर केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही. असे असतानाही चार महिने उलटले तरी अद्याप या टॉवरची दुरुस्ती केलेली नाही. यामुळे महामार्गावरून ये-जा करणाऱया वाहनचालकांच्या जीवाशी हा खेळ नाही का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काकती येथील बर्डे धाब्यानजीक हा धोकादायक विद्युत टॉवर आहे. महामार्गावरून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या क्रॉसिंग करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला टॉवर उभे करण्यात आले होते. यातील एका बाजूच्या टॉवरला मालवाहू ट्रकने धडक दिली. यामुळे हा टॉवर एका बाजूला झुकला गेला आहे. या घटनेला चार महिने उलटले तरी अद्याप याची दुरुस्ती झालेली नाही.
सध्या पावसाचे दिवस असल्याने सोसाटय़ाचा वारा सुटत आहे. वाऱयामुळे विद्युत टॉवर महामार्गावर कोसळेल, अशी भीती व्यक्त होत आहे. महामार्गावरून हजारो वाहने ये-जा करीत असल्याने हा विद्युत टॉवर कोसळल्यास दुर्घटना घडण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. त्यामुळे मोठा पाऊस सुरू होण्यापूर्वी याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
15 दिवसांत दुरुस्त करणार
वाहनाने धडक दिल्याने टॉवर एका बाजूला झुकला आहे. दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आल्या असून, येत्या 15 दिवसांमध्ये काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विवेक नाईक, साहाय्यक कार्यकारी अभियंता)









