ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. त्यानुसार, आज पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 34 ते 35 पैशांनी वाढ झाली. डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 15 ते 16 पैशांनी वाढ झाली आहे.
- मुंबईत पेट्रोल 107.54 रुपये
दिल्ली, कोलकाता आणि आता चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. तर मुंबई, पुण्यात मागील काही दिवसांपासून पेट्रोलची किंमत 100 पार गेली आहे. मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटर 107.54 रुपये तर डिझेल 97.45 रुपये इतके झाले आहे. तर पुण्यात पेट्रोल 107. 16 रुपये आणि डिझेल 95.60 रुपये प्रति लिटर इतके आहे.

दिल्लीत पेट्रोल 101.54 रुपये तर डिझेल 89.87 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 102.23 रुपये तर डिझेल 94.39 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 101.74 रुपये तर डिझेल 93.02 रुपये इतके वाढले आहे.
- भोपाळ – पेट्रोल : 109.89 रुपये (प्रति लिटर)
तर भोपाळमध्ये पेट्रोल 109.89 रुपये प्रति लिटर तर डिझेल 98.67 रुपये प्रति लिटर इतके आहे. तर पाटणामध्ये पेट्रोलसाठी 103.91 रुपये प्रति लिटर आणि डिझेलसाठी 95.51 रुपये मोजावे लागत आहेत. तर चंदीगडमध्ये पेट्रोलसाठी 97.64 रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी 89.5 रुपये प्रति लिटर इतके मोजावे लागत आहेत.
- दररोज 6 वाजता किंमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.









