नद्यांच्या पाणी पातळीत वाढ : संध्याकाळी मात्र पातळी ओसरली
प्रतिनिधी / डिचोली
रविवारी दिवसभर आणि रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे डिचोली व साखळीतील नद्यांना बरेच पाणी आले. दोन्ही नद्यांच्या पातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होते. साखळीतील वाळवंटी नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने बाजारात असलेल्या पंप हाऊसमधील पंप सुरू करून बाजारातील नाल्यात साचणारे पाणी बाहेर फेकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. संध्याकाळी मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर नदीतीलही पाण्यची पातळी कमी झाली होती.
गेल्या महिन्यात प्रारंभीच पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर डिचोली व साखळी या दोन्ही नद्यां?मधील पाण्याची पातळी वाढली होती. परंतु पुरस्थिती नियंत्रणात होती. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने नद्यांमधील पातळी डरीच ओसरली होती. आता मात्र पावसाने जोर धरल्याने दोन्ही नद्यांना पाणी वाढले आहे.
साखळीतील वाळवंटी नदी पात्रात बरेच पाणी वाढले होते. सकाळी या नदीत 3 मीटरपर्यंत पाणी वाढले होते. नदीत पाणी वाढल्याने साखळी बाजारात असलेल्या नाल्यामधून नदीत जाणारे पाणी अडून पडते. त्यामुळे साखळी बाजारात पाण्याची पातळी वाढते. हे वाढणारे पाणी बाजारातील पंप हाऊसमधील पंपद्वारे खेचून पुन्हा नदीत फेकण्याची प्रक्रिया सकाळी सुरू करण्यात आली होती. एक पंप सुरू करण्यात आला होता. जलस्रोत खात्याचे सहाय्यक अभियंता के.पी. नाईक व इतर अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
डिचोली नदीलाही पाणी बरेच आले होती. सकाळी या नदीने साडेतीन मीटर पर्यंत पातळी गाठली होती. त्यामुळे वॉकिंग टेकवर बसविण्यात आलेल्या पंपमधून नदीकिनारी भागात साचणारे पाणी बाहेर फेकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र संध्याकाळी पाण्याची पातळी काही प्रमाणात कमी झाली होती.
दोन्ही नद्यांमधील पाण्याची पातळी संध्याकाळी कमी झाली असली तरी पावसाचा जोर चालूच होता. त्यामुळे रात्री उशिरा नद्यांच्या पातळीत वाढ होण्याची शक्मयता लक्षात घेऊन आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.









