गोवा फॉवर्डचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
पणजीत उभारण्यात येणारा मलनिस्तारण प्रकल्प म्हणजे एक महाघोटाळा असल्याचा आरोप गोवा फॉवर्डचे दुर्गादास कामत यांनी केला आहे. त्वरीत प्रकल्प रद्द न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कोणतेही सोपस्कर पूर्ण न कराताच या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आल्या असल्याने पणजी स्मार्ट सिटीसाठी आलेल्या निधीचा भाजप सरकार निवडणुकीसाठी उपयोग करू पाहत आहे की काय असेही दुर्गादास कामत यांनी सांगितले.
येथील गोवा फावर्डच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दुर्गादास कामत बोलत होते यावेळी त्यांच्या सोबत जॉन नाझारेथ उपस्थित होते. पणजी मलनिस्तरण प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली पणजी स्मार्ट सिटी करण्यासाठी आलेला 160 कोटी रुपये भाजप सरकार लुटण्याच्या प्रयत्नात असून त्यांचा हा हेतू गोवा फॉवर्ड यशस्वी होऊ देणार नाही. असेही कामत यांनी सांगितले. भाजप सरकारचे आता थोडच दिवस बाकी राहिले आहे. सरकारच्या दबावाखाली येऊन सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे अधिकारी कागदपत्रावर सह्या करतील त्यांना कालांतराने अडचणीत आणू असा इशाराही कामत यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम खाते विभाग तीन यांनी मलनिस्तीकरण प्रकल्पाबाबत 132 कोटी रुपयांचे निवेदीका काढल्या आहेत. 8 जून रोजी त्या उगडण्यात आल्या असून दिल्ली येथील दोन तर बेंग्लोर येथील एका कंपन्यानीला काम देण्याचे ठरले आहे. मुळात प्रक्लपाबाबत कोणतेही सोपस्कर पूर्ण केलेले नसल्याने हा सार एक मोठा घोटाळा आहे. या साऱया प्रकाराची त्वरीत चौकशी व्हावी अशी मागणी दुर्गादास कामत यांनी केली आहे.









