आयुक्तांना नाव न घेता इशारा
प्रतिनिधी / सांगली
अपेक्स रुग्णालयातील रुग्ण मृत्यू प्रकरण गंभीर आहे. रुग्णालयाला नियमबाह्य परवानगी दिली असेल तर महापालिका आयुक्त यामध्ये निश्चितच दोषी आहेत. त्यामुळे त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा हे प्रकरण सीबीआयपर्यन्त नेऊ, असा इशारा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे. माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा आयुक्तांचा प्रयत्नही निषेधार्ह आहे, असेही शेलार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शेलार म्हणाले, अपेक्स प्रकरणाला भाजपने वाचा फोडली. प्रकरण लावून धरले आहे. या हॉस्पिटलमध्ये जवळपास ८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे गंभीर आहे. पण या प्रकरणात कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर हे प्रकरण सीबीआय पर्यन्त नेऊ. या प्रकरणात माध्यमांना आयुक्तांनी नोटीस बजावली आहे, हे निषेधार्ह आहे. अशी मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकारे लिहणाऱ्यांना लिहू दिले जात नसेल, बोलणाऱ्यांना बोलू दिले जात नसेल तर याची गंभीर दखल भाजपने घेतली आहे.








