पुणे \ ऑनलाईन टीम
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीत मनसेची एकला चलो रे भूमिका असणार का प्रश्नावर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असं उत्तर दिलं आहे. तसेच यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांच्या कारवाईबद्दल विचारले असता त्यांच्या सीडीची मी वाट पाहतोय. माझ्यावर ईडी लावलात तर मी सीडी बाहेर काढेन असे ते म्हणाले होते. कुठेय त्यांची सीडी मी त्या सीडीची वाट पाहतोय, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ईडीची कारवाई सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणावर राज ठाकरे यांनी वक्तव्य केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांना एकनाथ खडसे यांच्या कारवाईबद्दल विचारण्यात आले. यावर राज ठाकरे म्हणाले की, मी त्यांच्या सीडीची वाट पाहतोय असा टोला लगावला. तसंच सरकारकडून यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे अशी टीका देखील केली. काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही असाच वापर करण्यात आला होता. भाजपचं सरकार आल्यानंतर तेदेखील वापर करत आहेत. ही काही तुमच्या हातातली बाहुली नाही जिचा वापर तुम्हाला नको असलेला माणूस संपवण्यासाठी करायचा. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अशाप्रकारे करुन चालणार नाही. ज्यांनी गुन्हे केलेत ते मोकाट सुटले आहेत, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांना नारायण राणे यांच्याविषयी विचारण्यात आले. म्हणाले, मी नारायण राणेंना फोन केला होता, मात्र त्यांचा आणि त्यांच्या मुलांचादेखील फोन बंद होता. त्यामुळे मी एक दोन दिवसात फोन करेन,” असं राज ठाकरेंनी सागितलं.यासोबतच राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही मान्य आहे तर मग ओबीसी आरक्षण अडलंय कुठे? अशी विचारणा केली आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








