हळदोणचे आमदार रस्त्याकडे लक्ष देण्यास अकार्यक्षम
प्रतिनिधी /म्हापसा
आकय म्हापसा दरम्यान रस्त्याची दुर्दशा झालेली असून हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी म्हापशाचे आमदार तसेच हळदोणचे आमदार पूर्णतः अपयशी ठरले आहे. कमरखाजन भागात राहणाऱया नागरिकांना याचा बराच त्रास ये-जा करताना होत असून हळदोणा काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदारांचा निषेध करीत असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी या रस्त्यानजीक घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी हळदोणा गटाध्यक्ष आश्विन डिसोझा, राज्य गोवाचे सदस्य महाबळेश्वर तोरस्कर उपस्थित होते. 22 ऑक्टो 2020 साली आम्ही रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग खुला करावा अशी मागणी केली होती मात्र येथे अद्याप काहीच झाले नाही. आमदार, अधिकारी वर्ग येथे येऊन फक्त तपासणी करतात प्रत्यक्षात कृती काहीच होत नाही. यापलिकडे आमदारांनी काहीच केले नाही. यापूर्वी पेडे जंक्शनवर आले आकय कामरखाजन राहणाऱया नागरिकांसाठी काहीच केले नाही असे श्री. पणजीकर म्हणाले. तपासणी झाल्यावर नागरिकांना त्याचा काहीच फायदा झाला नाही त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी, आमदार, नगरसेवक आले नात्र काहीच झाले नाही. फ्रँकी कार्व्हालो, मर्लीन डिसोझा या नगरसेवकांनी आश्वासन दिले, पेडे मैदानावर सिग्नल घालतो सांगितले मात्र अद्याप काहीच नाही.
आमदारांच्या अकार्यक्षमतेचा निषेध करतो
सरकारी आमदाराला काहीच पडलेले नाही. उद्या परवा नगरसेवरांना जबरदस्तीने घून येणार व परत तपासणी करणार त्यापलीकडे त्यांच्याकडे काहीच होत नाही. आमदारांच्या अकार्यक्षमता बेजबाबदारपणाचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. हे काम कुठे पोचले याची माहिती आम्हाला द्या अशी मागणी पणजीकरांनी केली.
एमव्हीआर सरकारला ऐकत नाही ही दुर्दैवी बाब
लोकांचे सुख दुःख काहीच पडलेले नाही. फक्त ते कमिशनाच्या मागे आहेत. तार नदीची तपासणी केली त्याचे काय झाले. एमव्हीआर तुम्हाला ऐकत नाही. यामुळे सरकार लोटांगण घालते हे दिसून येते. सर्वीस रस्ते पहा, ट्राफिक सिग्नल नाही, नो एन्ट्री आहे तेथून आम्हाला यावे लागते. सर्वीस रस्त्याना खरोखरच सर्वीसची गरज आहे. सरकारना सर्वीस करायला पाहिजे रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत. सिग्नल बरोबर नाही तेथे ट्राफिक पोलीस ठेवा, शिस्त लावा, जो रस्ता व्हायला पाहिजे तो दिसत नाही. या वृत्तीचा आमदाराचा आम्ही निषेध करतो आणि या वाठारात जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे रस्ते दुरुस्त करावे. हॉटमिक्स सोडून द्या निदान खड्डे तरी बुझवा, लोकांना चांगले प्रशासन द्या हे सांगण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत असे श्री पणजीकर म्हणाले.
काँग्रेस केंद्रीय समितीचे कार्यकारी सदस्य तथा शालयचे नागरिक महाबळेश्वर तोरस्कर यावेळी म्हणाले की, हा रस्ता गेल्यावर्षी करून घेतला होता त्यावेळी आमदार ग्लेन टिकलो यांनी सर्व रस्ते हॉटमिक्स करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. मात्र येथील सर्व रस्ते खड्डेमय झालेले आहेत. पूर्वी हे म्हापशात पडत होते मात्र आता हे दोन वॉर्ड हळदोणात घातले आहे ते याकडे दुर्लक्ष करतात व येथे लक्ष देत नाही. सरकारने लोकांचे हाल करू नये. आमदार टिकलो फक्त पाच वर्षांनी एकदा लक्ष देतात. आमदार निवडून आणण्यासाठी वॉर्डमध्ये बदल केला जातो असे तोरस्कर म्हणाले. आमची परिस्थिती ‘ना घर का ना घाट का’ झालेली आहे. येथील रस्त्याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी श्री. तोरस्कर यांनी केली.









