कोटीपर्यंत संरक्षण मिळण्याचे संकेत -महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर योजना सादर
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोनाच्या संकटामुळे जगासोबत भारतामध्ये आरोग्यविषयक आतापर्यंत न झालेली जागृती झाली असल्याचे पहावयास मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर विविध विमा कंपन्या विमा पॉलिसीज बाजारात आणत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये देशातील विमा क्षेत्रात कार्यरत असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया जनरल इन्शुरन्सने एक विशेष विमा इन्शुरन्स पॉलिसी सादर केली आहे. कंपनीने सदरच्या पॉलिसीला ‘आरोग्य सुप्रीम’ असे नाव दिले आहे. यामध्ये ग्राहकांना 5 कोटीपर्यंत विमा संरक्षण मिळण्यासोबत अन्य सुविधा मिळणार असल्याची माहिती आहे.
आरोग्य सुप्रीम लाँच एसबीआय जनरल इन्शुरन्सने कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन ‘आरोग्य सुप्रीम’ नावाने एक विमा पॉलिसी सादर केली आहे. यामध्ये ग्राहकांनी ही पॉलिसी घेतली तर त्यांना संपूर्ण आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच यामध्ये जवळपास पाच कोटीपर्यंत विमा संरक्षणाची रक्कम मिळणार असल्याची माहिती आहे.









