सायकल चालवून केला निषेध
प्रतिनिधी / बेळगाव
पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. या महागाईमुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. सायकल चालवून या विरोधात जोरदार निदर्शने केली.
राज्यातील चौघांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले. मात्र, त्याचा काहीच फायदा होणार नाही. कारण केंद्र सरकार दरवाढीला आळा घालण्यात कुचकामी ठरले आहे, असा आरोप यावेळी आमदार सतीश जारकीहोळी यांनी केला. विकास दर कमी झाला आहे. त्यामुळे महागाई वाढत आहे, असा आरोपदेखील करण्यात आला.
काँग्रेसने संपूर्ण राज्यभर केंद्र सरकारविरोधात ही आंदोलने केली. यावेळी राजू सेठ, विनय नावलगट्टी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









