बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनासक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात पूर्ण लॉकडाऊननंतर पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी झाली आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ३८ हजारांवर पोहोचली आहे. राज्यात गेल्या २४ तासात २,५३० नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर ३,३४४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात गुरुवारी ६२ रुग्णांचा मृत्यू झाला. गुरुवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.६० टक्के होते. तर मृत्यू दर २.४५ टक्के होता.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८.६४ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २७.९० लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३५,६६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३८,७२९ इतकी आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ५१४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर याचवेळी ७५३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले.