प्रतिनिधी/सांगली
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाने नेहमीच प्रबोधनाचे कार्य केले आहे. अत्यंत कमी लोकांसह हभप बंडातात्या कराडकर यांनी पायी वारीचा संकल्प केल्यावर राज्यसरकारने कराडकर यांना स्थानबद्ध केले आहे. वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध करणे उचित नसुन त्यांची त्वरीत मुक्तता करावी अशी मागणी भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आज तहसीलदार यांना निवेदन देवून करण्यात आली. यावेळी ह.भ.प अजयकुमार वाले, श्रीकांत शिंदे, नगरसेविका ॲड.स्वाती शिंदे उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेविका ॲड. शिंदे म्हणाल्या, पंढरपूर पोटनिवडणुकीत पंढरपुरात मंत्र्यांच्या उपस्थितीत हजारो लोकांचे मेळावे झालेले चालतात. मंत्र्यांच्या सभांमुळे कोरोनाचा प्रसार होत नाही. पण, महाविकासआघाडी सरकारने मोजक्या लोकांच्या उपस्थितीतीतील वारी वर बंदी घातली आहे. शांतताप्रिय वारकरी संप्रदायावर पोलीस बळाचा वापर करणार्या महाविकास आघाडी सरकारला राज्यातील जनता धडा शिकवेल असेही शिंदे म्हणाल्या.
यावेळी बाळासाहेब बेलवलकर, अविनाश मोहीते, मोहन जामदार, गणेश कांबळे उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








