प्रतिनिधी/मिरज
मिरज-बेडग रस्त्यावर गुरुवारी सकाळी एक नर जातीचे हरीण मृत अवस्थेत आढळून आले आहे. पहाटेच्या वेळी एका ग्रामस्थाला रस्त्यावर हरीण पडल्याचे दिसले. हरणाचे पोट फाटले असून, अज्ञात वाहनाने हरणाला धडक दिल्याचा संशय आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांनी मयत हरीण ताब्यात घेतले आहे.
मिरज-बेडग रस्त्यापासून काही अंतरावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक करणाऱ्या डंपर या मार्गावरून ये-जा करीत असतात. या रस्त्यावरच बसवराज कोरे यांचे शेत आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता या शेतालगत असलेल्या रस्त्यावर एक प्राणी असल्याचे दिसले. रस्त्यावर अंधार होता. एका ग्रामस्थाने बॅटरीच्या सहाय्याने पाहिले असता मृत अवस्थेतील हरीण पडले असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत वन विभाग आणि प्राणी मित्रांना माहिती देण्यात आली. वन विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत हरीण ताब्यात घेतली. दरम्यान, रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार झालीचा अंदाज वन विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. मिरज-बेडग रस्त्यावर पहिल्यांदाच हरण बघितले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








