क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर गट शिक्षण कार्यालयातर्फे बेळगाव शहरातील शारीरिक शिक्षकांना कोरोनाच्या काळात घ्यावयाच्या दक्षतेबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद, सेतूबंधूबाबत प्रॅक्टिकल्स व व्हॉलीबॉल मैदानाची रूपरेषा यांची माहिती देण्यासाठी नूतन शहर शिक्षणाअधिकारी बी. आर. मठपती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
महिला विद्यालय स्कूलच्या सभागृहात शहर विभागीय गट शिक्षण कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून नूतन शहर शारीरिक शिक्षणाधिकारी बी. आर. मठपती, साहायक शारीरिक शिक्षणाधिकारी एल. बी. नाईक, बेळगाव शहर शारिरीक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, ज्ये÷ क्रीडा शिक्षक उमेश कुलकर्णी, महिला विद्यालय स्कूलचे मुख्याध्यापक पी. एन. पाटील आदी उपस्थित होते. कोरोना काळात ज्या क्रीडा शिक्षक व साहायक शिक्षकांचे निधन झाले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बी. आर. मठपती यांचे स्वागत एल. बी. नाईक यांनी केले. बी. आर. मठपती यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांबरोबर कोणत्या प्रकारे संवाद साधावा, त्यासाठी कोणत्या प्रकारच्या दक्षता घ्याव्या याची माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षणाचा ‘सेतूबंधू’ हा नवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सांघिक खेळांची माहिती देऊन कशाप्रकारे प्रात्यक्षिके दाखवावी याबद्दलचा आढावा त्यांनी घेतला. बी. आर. मठपती हे उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू त्याचप्रमाणे राज्यस्तरीय उत्तीर्ण पंच आहेत. आजच्या सत्रात व्हॉलीबॉल खेळाबद्दलची माहिती देत मैदानाची रूपरेषा, नेट, ऍन्टीना, पोल, व्हॉलीबॉल, मैदानाची आखणी व नवीन नियम, खेळाडूंची बदली याबद्दलची माहिती त्यांनी दिली. पुढील 2 महिन्यात शारीरिक शिक्षकांसाठी महत्त्वाच्या सांघिक खेळांच्या कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती बी. आर. मठपती यांनी दिली. व्ही. ए. कमती, पी. जी. पोलार, बी. आर. भस्मे, जी. बी. पाटील, एस. एम. भंडारी, एन. व्ही. पाटील, एम. एस. तुरमुरी, ऍन्थोनी डिसोझा, बापू देसाई, सी. आर. पाटील, ए. के. जगताप, विवेक पाटील, एस. व्ही. पाटील, आर. बी. पाटील, आर. के. पाटील, महेश पुजारी, जंगाप्पा लमाणी, विनायक पाटील, एस. व्ही. नडोनी, जी. व्ही. भोकणे, धनसिंग धनाजी, यू. आय. मजुकर, नागराज भगवंतण्णावर, सिव्हीया डिलिमा आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन बी. जी. हिरेमठ यांनी केले.









