प्रतिनिधी /पेडणे
अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातील अनुसूचित जातींचे बांधव विकासापासून वंचति आहे. राखीव जागेवर निवडून येणाऱया लोकप्रतिनीधींच्या कार्यावर विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती गोवातर्फे प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांची तळी उचलून धरणाऱया तोरसेचे पंच उत्तम वीर यांचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे समितीतर्पे तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे.
1951 मध्ये शेडयूल कास्ट फेडरेशनतर्फे पंजाब मधील पटियाला येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते. राखीव जागेवरुन निवडून गेलेले प्रतिनिधी समाजाची कामे न करता भडवेगीरी आणि दलालीच करतील. याचीच प्रचिती उत्तम वीर यांनी करून दिलेली आहे. उत्तम वीर यांनी अनुसूचित जातींच्या वस्त्यांना हरिजन वाडे असा असंविधानिक शब्द प्रयोग करून केवळ अनुसूचित जातीतील बांधवांचा केवळ अपमान केला नसून भारतीय संविधानाचा अपमान केला आहे. भारतीय संवधानाचा अवमान करणे म्हणजे देशद्रोह करणे होय. त्यांच्यावर सरकाने देशद्रोहाचा खटला नोंद करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी करत आहोत.
पेडणे राखीव मतदारसंघ हा केवळ पेडणेपुरता मर्यादित नसून हा संपूर्ण गोव्याचा मतदारसंघ असल्याने येथून निवडून येणाऱया लोकप्रतिनीधींनी संपूर्ण गोव्यातील अनुसूचित जातीच्या विकासासाठी झटणे, हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे, पण तसे होताना दिसत नाही. उत्तम वीर यांना आजगांवकराविषयी येवढाच पुळका येत असेल तर विश्वभूषण समितीतर्फे संपूर्ण गोप्यातील अनुसूचित जातीच्या विकासासाठी केलेल्या आठ मागण्या ज्या बाबू आजगांवकरांच्या कार्यालयात नोंद करून विद्यमान मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवल्या आहेत. त्या सरकार दरबारी मंजूर करून घ्याव्या व आपण अनुसूचित समुहाच्या विकासासाठी झटत असल्याचे वीर यांनी सिद्ध करावे.
सखाराम कोरगांवकर व कार्यकर्ते विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीच्या माध्यमातून पेडणेपासून काणकोणपर्यंत आपल्या समाज बांधवावर अन्याय झाल्यास त्या विरुद्ध आवाज उठतात. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. तसेच समाजाच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी समिती कार्यरत आहे. तरी सुद्धा उत्तम वीर यांची विश्वभूषण समिती विरोधी भूमिका म्हणजे समाजाशी बेईमानीचे प्रदर्शन होय आहे, असे सखाराम कोरगावकर यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे.









