धातू-आर्थिक क्षेत्राची स्थिती भक्कम- टाटा स्टीलचे समभाग मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशीच्या सत्रात बुधवारी दिवसअखेर सेन्सेक्स 194 अंकांची तेजी प्राप्त करुन प्रथमच 53,000 चा टप्पा प्राप्त करत बंद झाला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळातील फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या लिलावामधून धातू, आर्थिक आणि बँक क्षेत्रातील समभागाच्या मजबुतीमुळे बाजार सावरला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील ट्रेडिंगदरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरात घसरण झाल्याने जागतिक पातळीवरील स्थिती नकारात्मक राहिल्याने तेजी काहीशी कमी राहिली होती. चढउताराच्या प्रवासात दिवसअखेर सेन्सेक्स 193.58 अंकांनी वधारुन 0.37 टक्क्यांच्या मजबूतीसोबत निर्देशांकाने 53,054.76 टक्क्यांचा विक्रम प्राप्त केला आहे. याच्या विरुद्ध बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 61.40 अंकांनी वाढून निर्देशांक 15,879.65 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या समभागात 4.38 टक्क्यांची तेजी राहिली होती, तर सर्वाधिक टाटा स्टीलचे समभाग मजबूत स्थितीत राहिले होते. यासह बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, एचडीएफसी, नेस्ले इंडिया, एशियन पेन्ट्स, सन फार्मा आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभागही तेजीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टायटन, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा आणि बजाज ऑटोसह अन्य समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
बुधवारी दुपारनंतर बाजारात धातू क्षेत्रातील समभागाच्या मजबूत कामगिरीने तेजी परतली आहे. यासोबत केंद्रीय मंत्रिमंडळात होणाऱया फेरबदलामुळे गुंतवणूकदारांमध्ये रुची राहिल्याचे दिसून आले. जागतिक बाजारात आशियासह अन्य बाजारात हाँगकाँग, सियोल आणि टोकीयो हे नुकसानीत राहिले आहेत. शांघाय तेजीत राहिला होता.








