मुंबई \ ऑनलाईन टीम
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या दालनात भाजप आमदारांनी घातलेल्या गोंधळानंतर भाजपचे बारा आमदार निलंबित करण्यात आले. यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांना सोंगाड्या तसेच नरकासुर म्हणत निशाणा साधला आहे. यावर आता भास्कर जाधव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, नितेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची गरज नाही. तसंच मी फडतूस माणसाबद्दल बोलत नाही..असा पलटवार भास्कर जाधव यांनी केला.
नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका करत म्हटले होती की, तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे. या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले नाहीत, स्वत:चे कपडे फाडले नाहीत. या सरकारकडून काही अपेक्षा नाही, ओबीसी आरक्षणावरून आमचे सहकारी लढले आहेत. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात. हा माणूस सोंगाड्या, नरकासूर आहे.
Previous Articleकर्नाटक: चित्रदुर्गच्या ‘या’ खासदाराची पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात लागणार वर्णी
Next Article हिजबुलच्या टॉप कमांडरचा खात्मा








