मुंबई
21 टक्के प्रीमीयमसह शेअर बाजारात लिस्टेड झालेल्या इंडियन पेस्टीसाईडच्या समभागाला शेअरबाजारातील तेजीचा चांगला आधार मिळाला आहे. इंडिया पेस्टीसाइडचा समभाग शेअर बाजारात 29 पट सबस्क्राइब झाला होता. इंडिया पेस्टीसाइडचा समभाग 360 रुपयांवर लिस्टेड झाला आहे. सदरची कंपनी ही कृषीविषयक रसायन निर्मिती करते. सध्याच्या परिस्थितीत हा समभाग गुंतवणुकीस योग्य असल्याचा होरा तज्ञानी व्यक्त केला आहे.









