मुंबई \ ऑनलाईन टीम
ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गायब झाल्याचे बोलले जात होते. लोणावळ्यात ईडीने छापेदेखील टाकले होते. या सगळ्या घटनाक्रमानंतर प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावली. दरम्यान यावेळी त्यांनी आपल्यावरील कारवाईचा निषेध करताना या देशामध्ये माझ्यावर कुठेही एफआयआर नाही, माझ्या विरोधात कोणी वक्तव्य दिलेले नाही त्यामुळे मी काही विजय माल्या वा नीरव मोदी नाही असं म्हटलं आहे.
यावर बोलताना सरनाईक म्हणाले की, या देशात किंवा कुठेही माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा तक्रार नाही. कोणीही माझ्याविरोधात जबाब दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दिलं आहे. ईडीच्या कारवाईमुळे मी गायब झालो असं नाही. माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया, पत्नीचा कॅन्सर, कुटुंबावर कोरोनाचा घाला अशी संकटे आली होत. मी कुठेही गायब झालो नव्हतो. परिस्थिती पाहता मी काही दिवस शांत राहण्याचा निर्णय घेतला होता. मी काही विजय माल्या , नीरव मोदी नाही, ईडीने कारवाई केली म्हणून गायब होणार, बाहेर जाणार, पळून जाणार, असे ते म्हणाले.
युतीचे सरकार स्थापन होत होते तेव्हा मातोश्रीवर जी चर्चा झाली. त्यावेळी अडीज अडीज वर्षांचे मुख्यमंत्री पद द्या अशी जी घोषणा केली ती मी केली होती. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत होते. तेव्हा मी आणि माझी मुले काँग्रेस, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे आमदार कुठे ठेवावे, याची तयारी करत होतो. त्यांची विचारपूस करत होतो.तसेचअर्णब गोस्वामीने अलिबागची केस दाबली होती, त्यावर आवाज उठविला. कंगना राणावतने जे मुंबई पोलिसांवर वक्तव्य केले. या काळात मी पक्षाच्या प्रवक्ते पणाचे काम केले होते. गोस्वामीची केस पुन्हा बाहेर यावी यासाठी आवाज उठविला असल्याचे देखील प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








