कापशी / वार्ताहर
शिवारे तालुका शाहूवाडी येथील जवान अजित बाजीराव पाटील याचे हिमाचल प्रदेश मधील चंबा जिल्हा येथे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. देशसेवेसाठी कार्यरत असणाऱ्या शिवारे गावच्या अवघ्या 29 वर्षे वयाच्या जवानाचा मृत्यू झाल्यामुळे शिवारे आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अजितचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय शाळा शिवारे माणगाव येथे झाले व माध्यमिक शिक्षण सिद्धेश्वर हायस्कूल कापशी येथे झाले. बारावी नंतर त्याची 2014 मध्ये (सी.आय.एस.एफ.) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यामध्ये त्याची निवड झाली.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या नोकरीची सुरुवात राजस्थानमध्ये झाली. आणि सध्या तो हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्हा येथे कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. अजितचा विवाह दीड वर्षांपूर्वी झाला असून त्याला दहा महिन्याचा एक मुलगा आहे. अवघ्या दहा वर्षाच्या मुलाच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र हरपल्यामुळे लोकांचा आक्रोश कान पिवटळुन टाकणारा होता. त्याच्या मृत्यूची बातमी शिवारे गावात कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. आज रविवार दिनांक 4 रोजी अजीतचे पार्थिव दुपारी तीन च्या दरम्यान पुणे येथून शववाहिकने शिवारे येथे आणण्यात आले. तो एकुलताएक मुलगा असल्यामुळे त्याचे आई वडील, चुलते व कुटुंबीयांचा आक्रोश कान पिवटळुन टाकणारा होता.
फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. व सर्वांनी कोरूना च्या पार्श्वभूमीवर कोरणा चे सर्व नियम पाळून त्याला साश्रूनयनांनी निरोप दिला. या वेळेस शाहूवाडी चे पी.आय.भालचंद्र देशमुख, नायब तहसीलदार विलास कोळी, मंडल अधिकारी बी आर मादळे, तलाठी एच एस बदडे हे शासकीय प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी , दहा महिण्याचा मुलगा, चुलते, चुलत्या, चुलत भाऊ, असा मोठा परिवार आहे.