सुहास पाटील / उंडाळे :
आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा आग्रह धरत आंदोलन करणाऱ्या बंडातात्या कराडकरांना पुणे पोलिसांनी आळंदी येथुन ताब्यात घेऊन करवडी ता. कराड येथे आणून स्थानबद्ध केले आहे.
करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन आश्रमात पोलिसांनी बंडातात्यांना स्थानबद्ध करुन कराड पोलिसांकडे ही जबाबदारी दिली. आश्रमात वारकर्यांसह पुणे पोलिसांसह कराड पोलीस हजर होते. येत्या चार दिवसात पायी वारी आंदोलनाविषयी ठोस भूमिका घेतली जाईल, तोपर्यंत राज्यातील जनतेने व वारकऱ्यांनी संयम पाळावा, असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी यावेळी केले.









