15 जुलैपर्यंत मुदत : परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांची माहिती
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्य सरकारने खासगी प्रवासी वाहनांचा कर भरण्याची मुदत 15 जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. मालवाहतूक होणाऱया वाहनांनाही ही सवलत देण्यात आली आहे. मात्र, नव्याने नोंदणी झालेल्या वाहनांसाठी ही सवलत लागू असणार नाही, अशी माहिती परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली आहे.
कर्नाटकात नोंदणी झालेल्या प्रवासी आणि मालवाहतुकीच्या वाहनांचा कर भरण्यासाठी 30 जूनपर्यंत अंतिम मुदत होती. आता ही मुदत 15 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. कर्नाटक मोटार वाहन कायदा 1957 च्या कलम 4 (1) नुसार विनादंड कर भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, असे यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱया लाटेवर नियंत्रण आणण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱया खासगी वाहन मालकांनाही आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे सरकारने त्यांना कर भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.









