29 बळी, 1426 नवे रूग्ण, 1021 कोरोनामुक्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 426 नवे रूग्ण आढळले. सक्रीय रूग्णसंख्या 12 हजार 357 झाली आहे. दिवसभरात कोरोनाने 29 जणांचा मृत्यू झाला तर 1 हजार 21 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या घटली असून सक्रीय रूग्ण 12 हजारांवर पोहोचले आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 29 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 712 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 520, नगरपालिका क्षेत्रात 693, शहरात 974 तर अन्य 525 आहेत. दिवसभरात 1 हजार 21 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 38 हजार 694 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 426 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 73, भुदरगड 25, चंदगड 9, गडहिंग्लज 41, गगनबावडा 1, हातकणंगले 133, कागल 40, करवीर 257, पन्हाळा 116, राधानगरी 44, शाहूवाडी 27, शिरोळ 109, नगरपालिका क्षेत्रात 132, कोल्हापुरात 398 तर अन्य 21 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 55 हजार 758 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून मंगळवारी 14 हजार 9 अहवाल आले. त्यापैकी 12 हजार 583 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 869 अहवाल आले. त्यातील 3 हजार 465 †िनगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 9 हजार 272 अहवाल आले. त्यातील 8 हजार 498 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 868 रिपोर्ट आले. त्यातील 620 निगेटिव्ह आहेत.
परजिल्ह्यातील तिघांचा तर शहरातील 9 जणांचा मृत्यू
परजिल्ह्यातील बेळगाव जिल्ह्यातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोल्हापूर शहरातील 9 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये राजारामपुरी, कसबा बावडा, सरनाईक कॉलनी, प्रतिभानगर, साने गुरूजी वसाहत, कॉमर्स कॉलेज चौक, श्रीकृष्ण लॅब येथील प्रत्येकी 1 व शिवाजी पेठेतील दोघांचा समावेश आहे.
कोरोना रूग्ण 1426 : एकूण : 1,55,758
कोरोनामुक्त 1021 : एकूण : 1,38,694
कोरोना मृत्यू 29 : एकूण मृत्यू : 4712
सक्रीय रूग्ण : 12352