अभिनेत्री रविना टंडन हिने मध्यप्रदेशातील बांधवगड नॅशनल पार्कमधील आकर्षक छायाचित्रे शेअर केली आहेत. यात रविना स्वतःच्या कुटुंबीयांसोबत जंगलसफारीचा आनंद घेताना आणि बांधवगढमध्ये वाघाला कॅमेऱयात कैद करताना दिसून येत आहे.
या जंगल सफारीत रविनाची मुलगी राशा थडानी देखील सोबत आहे. मायलेकीने वाइल्डलाइफचा पुरेपूर आनंद घेतला तसेच कॅमेऱयात वाघाला कैद केले आहे. रविनाने जंगलात हिंडणाऱया वाघाची चित्रफितही शेअर केली आहे. अभिनेत्रीने या छायाचित्रांच्या माध्यमातून स्वतःचे छायाचित्रणाचे कौशल्यही दाखवून दिले आहे.

अनेक वन्यप्राणी रस्त्यावर वाहनांखाली चिरडून मारले जातात. राज्य सरकारने या रस्त्यांवर वाहतुकीसाठी अनुमती देताना काळजी घेण्याची गरज आहे. जंगलात रस्तेनिर्मितीला बंदी घालण्याचा यात पर्याय असू शकतो. आम्ही आमचे सुंदर वन्यप्राणी रोडकिलमध्ये गमावून बसतो. असे रविनाने म्हटले आहे.
रविना लवकरच बहुप्रतीक्षित ‘केजीएफ चॅप्टर 2’मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ती दक्षिणेतील सुपरस्टार यशसोबत मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटात यश आणि रविनासोबत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 16 जुलै रोजी प्रदर्शित केला जाऊ शकतो.









