नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
केंद्रीय कायदा आणि न्याय, माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट कॉपीराईट कायद्याचे अल्लंघनासंदर्भात ब्लॉक करण्यात आलं होतं. एका तासानंतर अकाऊंट सुरु झाल्याची माहिती रवि शंकर प्रसाद यांनी दिली आहे.
रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. मित्रांनो आज माझ्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली. ट्विटरने मला माझ्या अकाऊंटचा अॅक्सेस जवळजवळ तासभर दिला नव्हता. मी अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन केल्याचं मला सांगण्यात आलं आणि नंतर मात्र मला त्यांनी अॅक्सेस दिला.
ट्विटरची ही कृती माहिती तंत्रज्ञान कायदा 2021च्या नियम 4(8) चं उल्लंघन करते. ट्विटरनं माझ्या खात्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यासंबंधीची नोटीस द्यायला हवी होती त्यांनी से केलं नाही, असं रवि शंकर प्रसाद म्हणाले. ट्विटरवर करण्यात येणाऱ्या कारवाईसंदर्भातील वक्तव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ट्विटरसंबंधात विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतींच्या क्लिपचा परिणाम समोर आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही टेलिव्हिजन चॅनेल आणि कोणत्याही अँकरनं कॉपीराईट नियमांचं उल्लंघण झाल्याती तक्रार केली नाही.
ट्विटरनं केलेली कृती ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या बाजून नसल्याचं समोर आलं आहे. त्यांना त्यांचा अजेंडा राबवायचा असल्याचं दिसून आलं आहे. ते सतत तुम्हाला आम्ही आखून दिलेल्या नियमांनुसार वागला नाहीत तर आम्ही तुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकू अशी भीती दाखवत असतात, असा आरोपही रवी शंकर प्रसाद यांनी केलाय. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कोणत्याही प्रकारे नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार लागू करण्यात आलेले नियम मान्य करावे लागतील, त्या बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं रवि शंकर प्रसाद म्हणाले.
ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात आधीच वाद सुरु असताना आता केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचे अकाऊंट अॅक्सेस करण्यास ट्विटरकडून नकार देण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे हा वादा आणखी पेट घेण्याची शक्यता दिसत आहे.









