मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या या छाप्यावरुन भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचे छापेमारी केल्याचं कळालं. मला वाटतं हे सगळं सत्ताप्रेरित आहे. सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का , ईडी आणि सीबीआयची बदनामी होत आहे, हे संबंधितांनी लक्षात घ्यावं. प्रताप सरनाईक यांच्याबाबतीतही तेच झालं. अशा गोष्टींमुळे विनाकारण त्रास होतो. विनाकारण त्रास हा शब्द सरनाईक यांच्या पत्रात देखील होता. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नाही. काल अनिल परब आणि अजित पवारांच्या चौकशीचा ठराव भाजपनं बैठकीत केला. हे नेमकं कुठलं राजकारण आहे?, असं संजय राऊत म्हणाले.
जर सीबीआयला तपास करायचाच असेल तर अयोध्येच्या महापौरांनी अयोध्या मंदिर ट्रस्टसोबत जो व्यवहार केला, त्या प्रकरणाचा तपास करा. ती केस सीबीआयसाठी फिट आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.
केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन केंद्र सरकार विनाकारण त्रास देण्याचं काम करत असल्याचा आरोप केला आहे. राज्यातील नेत्यांवर विनाकारण आरोप करुन त्याचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रकार केला जाता असल्याचंही संजय राऊत म्हणाले. तसेच आणीबाणीला विसरा आता. त्याचा बाऊ करु नये. इंदिरा गांधी यांनी थेट आणीबाणी लावली होती. सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी वाटते. राष्ट्रहितसाठी कठोर व्हायला हवं, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








