प्रतिनिधी / गोकुळ शिरगाव
पुणे-बंगलोर महामार्गावरील उजळाईवाडी येथील हॉटेल ऑरेंज व हॉटेल तडका या दोन हॉटेलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश धुडकावून हॉटेल चालू ठेवल्याप्रकरणी दोन हॉटेल चालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोरोणा संसर्गाच्या प्रतिबंधा करिता जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार नेमून दिलेल्या नियमांचे व वेळेचे उल्लंघन करीत जेवणा करता गिऱ्हाइकांची हॉटेलमध्ये गर्दी जमवून संसर्गाचा धोका वाढवल्या प्रकरणी हॉटेल ऑरेंजचे चालक मोहसीन अब्दुल सत्तार मुल्ला (वय ३५ वर्ष रा.एमएसईबी ऑफिस समोर यादव नगर कोल्हापूर) व हॉटेल तडकाचे चालक सुरज इराप्पा सुतार (वय ३८ रा. बँक ऑफ बडोदा शेजारी,रुईकर कॉलनी,कोल्हापूर) या दोघांविरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तेलंग करीत आहेत. यासंबंधी फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल बाजीराव पवार यांनी दिली.