ओटवणे / प्रतिनिधी:
माजगाव येथील रहिवाशी हरेश सिताराम चव्हाण ( ७५) यांचे बुधवारी २३ जून रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी सावंतवाडी येथील उपरलकर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कर करण्यात आले.
कै. हरेश चव्हाण यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या निधनाची दुःखद बातमी समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचा मुलगा भारत पेट्रोलियम या कंपनीमध्ये उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तसेच त्यांची मुलगी मुंबई येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये लघु लेखक म्हणून कार्यरत आहे.
जिल्हा न्यायालयाच्या सेवानिवृत्त प्रबंधक सागरिका चव्हाण यांचे ते पती होत. तर सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळचे उपअभियंता तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागच्या कार्यकारी अभियंता सौ. अनामिका जाधव यांचे ते वडिल होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









