प्रतिनिधी / सातारा :
माण तालुक्यातील एका गावात 12 वर्षीय मुलीला धमकी देत एका अल्पवयीन मुलासह 19 वर्षीय युवकाने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर 19 वर्षीय युवकास अटक करण्यात आली असून, 15 वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुलै 2020 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत ही घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी एकटी घरात असताना 19 वर्षीय युवक घरात आला. तिच्याशी लगट करुन गप्पा मारु लागला. यावेळी 15 वर्षीय मुलगाही तिथे आला त्याने मुलीला तुझे या 19 वर्षीय युवकाशी लफडे असून, ते मी ते तुझ्या काकाला सांगतो, अशी धमकी दिली. त्यानंतर या दोन युवकांनी तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले. यामध्ये ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारुन टाकीन, अशी धमकी दिल्याने ती मुलगी गप्प राहिली होती. मात्र, तिचा गरोदरपणा लक्षात आल्याने हा प्रकार समोर आला.









