बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने “कोरोनाच्या तृतीय लाटचे विश्लेषण, सल्ला व नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या” उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल सादर केला आहे. सादर केलेल्या या अंतरिम अहवालात वरिष्ठ-स्तरीय विद्यार्थ्यांसाठी प्रथम-कॅम्पस वर्ग सुरू करण्यासह, शिस्तबद्ध पद्धतीने शाळा पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली आहे.
कार्डियाक सर्जन डॉ देवी शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तयार केलेला ९१ पानांचा अंतरिम अहवाल मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना सादर करण्यात आला आहे.
अहवालात असे नमूद केले गेले आहे की आतापर्यंत जगात कोठेही असा पुरावा मिळालेला नाही की व्हायरस पसरविण्यासाठी शाळा केंद्र होऊ शकते. या अहवालात नमूद केले आहे की, “शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शास्त्रीय आणि निश्चित मार्गदर्शन करण्याची गरज आहे कारण शालेय शिक्षण सुरु होण्यास उशीर झाल्यास कोरोनाच्या तुलनेत जास्त हानिकारक ठरेल.