वृत्तसंस्था/ सेंट पीर्टसबर्ग
युरो चषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी ब गटातील बेल्जियम आणि फिनलँड यांच्यात सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यासाठी बेल्जियम संघातील मध्यफळीत खेळणारा फुटबॉलपटू थॉर्गेन हेझार्ड उपलब्ध होवू शकणार नाही, असे बेल्जियमच्या फुटबॉल फेडरेशनने म्हटले आहे.
युरो चषक फुटबॉल स्पर्धेत गेल्या गुरूवारी झालेल्या सामन्यात बेल्जियमने डेन्मार्कचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता. या सामन्यात बेल्जियमच्या हेझार्डने निर्णायक गोल केला होता. हेझार्डला गुडघा दुखापत झाल्याने तो सोमवारी होणाऱया फिनलँड बरोबरच्या सामन्यात खेळू शकणार नाही, असे बेल्जियमच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.









