वृत्तसंस्था/ पॅरीस
जर्मनीत पुढील आठवडय़ात होणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील बॅड होमबर्ग ग्रासकोर्ट महिलांच्या टेनिस स्पर्धेतून रूमानियाच्या माजी टॉप सीडेड 29 वर्षीय सिमोना हॅलेपने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. आता 28 जूनपासून सुरू होणाऱया विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील तिच्या सहभागाविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
हॅलेपला गेल्या काही दिवसापासून वारंवार धोंडशीर स्नायू दुखापतीची समस्या बेडसावत आहे. या दुखापतीमुळे तिला प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत सहभागी होता आले नाही. 12 मे रोजी झालेल्या रोम खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत दुसऱया फेरीतील सामन्यात खेळताना हॅलेपला ही दुखापत झाली होती. 2019 साली हॅलेपने विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. कोरोना महामारीमुळे 2020 ची विंबल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली होती त्यामुळे 2021 च्या विंबल्डन स्पर्धेतील हॅलेप विद्यमान विजेती आहे.









