ऑनलाईन टीम
कोरोना महामारीमुळे देशाचे आर्थिक चक्र कोलमटले आहे. अनेकांवर बेरोजगारीची कुराड कोसळली आहे. यातच महागाईचा वाढता आलेख कायम आहे. यामुळे सर्वसामान्य जनता पुर्णत: कोलमडून गेली आहे. अशातच गेली काही महिने इंधन दरवाढीने सपाटा लावला आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असून पेट्रोलपाठोपाठ आता डिझेलही शंभरीच्या उबंरठ्यावर येवून पोहचले आहे. इंधन आणि खाद्यतेलाच्या या दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
यातच आज, रविवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. देशाची राजधानी दिल्लीमध्ये रविवारी पेट्रोल प्रतिलिटर ९७ रुपये २२ पैसे तर डिझेल प्रतिलिटर ८७ रुपये ९७ पैसे दराने विकलं जात आहे. तर, मुंबईमध्ये प्रतिलिटर १०३ रुपये ३६ पैसे तर डिझेलसाठी ९५ रुपये ४४ पैसे मोजावे लागत आहेत. भोपाळमध्ये हेच दर अनुक्रमे १०५ रुपये ४३ पैसे आणि ९६ रुपये ६५ पैसे इतके आहेत. तर दुसरीकडे पाटण्यामध्ये अनुक्रमे ९९ रुपये २८ पैसे आणि ९३ रुपये ३० पैसे दर झाले आहेत.
देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल दरांनी शंभरी गाठली आहे. राज्यांच्या राजधान्यांमध्ये सर्वात आधी भोपाळमध्ये पेट्रोल दरांनी शंभरी पार केली. त्यापाठोपाठ जयपूर आणि मुंबईनंतर आता अनेक ठिकाणी पेट्रोल पाठोपाठ डिझेल शंभरी पार होण्याच्या मार्गावर आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








