मुंबई :
रिलायन्स जिओ व जिओ भारत 4 जी फिचर्स असणारा 999 रुपये किमतीचा फोन सादर करण्यात आला आहे. कंपनी 2 जी फोन वापरत असलेल्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊनच हा फोन बाजारात आणला असल्याचे अनेक अभ्यासकांचे मत आहे.
यावेळी कंपनीने सांगितले की पहिल्या 10 लाख ‘जिओ भारत फोन’साठी बीटा ट्रायल 7 जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. कंपनीने या फोनसाठी 123 रुपयांचा टॅरिफ प्लानदेखील सादर केला आहे. यात 14 जीबी डेटा मिळेल जो 28 दिवस चालेल. म्हणजे दररोज 0.5 जीबी याशिवाय या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल्सची सुविधाही मिळणार आहे.
फोनची रचना कॉम्पॅक्ट आहे आणि हा फोन 1.77-इंच टीएफटी क्रीनसह येतो. 1000 एमएएच बॅटरीसह हा फोन येतो. या डिव्हाईसमध्ये फक्त जिओ सिम वापरता येईल. युजर्सना डिव्हाइसमध्ये प्री-इंस्टॉल केलेले 3 जिओ अॅप्स मिळणार आहेत.









