सिंधुदुर्गातील वायंगणी किनाऱ्यावरील प्रजनन केंद्रातील कासवपिल्ले
वेंगुर्ले (भरत सातोस्कर )-
वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर चालू हंगामात 20 डिसेंबर रोजी आँलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या घरट्यातून (विणीतून) 99 पिल्ले बाहेर पडली. या सर्व पिल्लांना कासवमित्र यांनी कांदळवन अधिकारी , कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत सागरी नैसर्गिक अधिवासात सोडले. वायंगणी किनाऱ्यावर चालू वर्षाच्या कासव हंगामात सुमारे 70 ऑलिव्ह कासवांनी अंडी लावलेली आहेत. या कासव विणीचे प्रजनन केंद्र म्हणून असलेल्या या भागात 70 विणींचे संरक्षण कासव मित्र सुहास तोरस्कर करत आहेत. दिनांक 20 डिसेंबर रोजी वायंगणी किनाऱ्यावर स्थानिक ग्रामस्थ चंदू मोर्जे यांना आँलिव्ह रिडले कासवाची अडगळीच्या ठिकाणी लावलेली अंडी आढळून आली. त्याने कासवमित्र सुहास तोरस्कर यांना ते ठिकाण दाखवले . कासव मित्र सुहास तोरस्कर यांनी वायंगणी येथील आँलिव्ह रिडले कासव जातीच्या कासवाने घातलेली अंडी सुरक्षित राहण्यासाठी प्रजनन केंद्रात आणून संरक्षित केली १०८ कासव अंड्यांपैकी 99 अंड्यातून आज कासवाची पिल्ले बाहेर पडली. या सर्व कासवाच्या पिल्लांची पहिली बॅच कासव मित्र सुहास तोरस्कर यांनी वन विभाग व कांदळवन विभाग यांच्या उपस्थितीत सागरी अधिवासात मुक्त केली . यावेळी कांदळवन विभागाचे अधिकारी राज तेली ,दत्ता मुकाडे, दीपक कांबळी, नयन घडशी, शुभम कांबळे आदी अधिकारी, कर्मचारी वायंगणी किनाऱ्यावर दाखल झाले. स्थानिक कासव मित्र सुहास तोरस्कर तसेच स्थानिक नागरिक चंदू मोर्जे, संतोष साळगावकर, सुरज तोरस्कर, संजय तोरस्कर, निलेश पेडणेकर, योमा फाटक आदींच्या उपस्थितीत सागरी नैसर्गिक अधिवासात सर्व कासव पिल्लांना सोडण्यात आले आहे.









