कॅरिबियन देश डोमिनिकनमध्ये दुर्घटना : 150 हून अधिक जण जखमी
वृत्तसंस्था/ सँटो डोमिंगो
कॅरिबियन देश डोमिनिकन रिपब्लिकमध्ये एका नाईटक्लबचे छत कोसळून 98 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 150 हून अधिक जण जखमी झाले. ही घटना राजधानी सँटो डोमिंगोमधील जेट सेट नाईटक्लबमध्ये एका प्रसिद्ध गायकाचा संगीत कार्यक्रम सुरू असताना घडली. या घटनेत गायकाचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या दुर्घटनेवेळी नाईटक्लबमध्ये 400 हून अधिक लोक उपस्थित होते. मध्यरात्रीच्या आधी संगीत कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सुमारे एक तासाने छप्पर कोसळले. छप्पर कोसळण्याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून केला जात आहे.









