संग्रहालयात युवकाचे अजब कृत्य
अनेकदा कुणाच्या खोडकरपणामुळे मोठे नुकसान होत असते. इटलीतील प्रसिद्ध कलाकार माउरिझियो कॅटेलन यांच्यासोबत काहीसेच असेच घडले आहे. एका संग्रहालयात कॅटेलन यांच्या एका 98 लाख रुपयांच्या कलाकृतीच्या हिस्स्याला कुणीतरी गिळपृंत केले आहे. या कलाकृतीला ‘कोमेडियन’ नाव देण्यात आले हेते.

दक्षिण कोरियाच्या सोल येथील लियुम म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित प्रदर्शनात भिंतीवर एक पिकलेली केळी टेपद्वारे चिकटविण्यात आली होती. हा प्रकार विचित्र असला तरीही ते कॅटेलन यांच्या कलाकृतीचा हिस्सा होते. आता हीच केळी संग्रहालयात आलेल्या एका विद्यार्थ्याने फस्त केली आहे. याचबरोबर त्याने केळय़ाची साल परत भिंतीवर चिकटविली आहे.
या विद्यार्थ्याचे नाव नोह हुएन-सू असे असून या घटनेचे चित्रण त्याच्या मित्राने केले होते. आता याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मी घरातून नाश्ता करून आलो नव्हतो आणि मला भूक लागली होती असे नोहने म्हटले आहे. तर संग्रहालयाच्या प्रवक्त्याने हा प्रकार अचानक घडल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कॅटेलन यांच्या कलाकृतीकडे मी एका सत्तेच्या विरोधातील बंड म्हणून पाहिले. बंडाच्या विरोधातही एक बंड होऊ शकते असे नोहने म्हटले आहे.









