नवी दिल्ली : राष्ट्रीय कॉंग्रेसच्य़ा अध्यक्षपदासाठीचा निवडणुक आज संपन्न झाली. 22 वर्षात पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला मतदान करण्यात आले. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या 9915 पात्र मतदारांपैकी अंदाजे 9500 मतदारांनी मतदान केले. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे जरी झुकते माप असले तरी खासदार शशी थरूर यांनीही चांगली वातावरण निर्मिती केल्याचे दिसून आले. देशाच्या विविध भागात मतदान करणाऱ्या प्रमुख नेत्यामध्ये कॉंग्रसच्या पक्ष प्रमुख सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी पक्षप्रमुख राहूल गांधी आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मतदान केले.
प्राथमिक मुल्यांकनानुसार निवडणुकिस मतदान करण्यास पात्र ठरलेल्या 9915 मतदारापैकी 9497 मतदारांनी मतदान केले. अध्यक्षपदासाठी एकुण 95.78 टक्के मतदान झाल्याची माहिती कॉंग्रसच्या केंद्रीय निवडणुक प्रधिकरणाचे अध्यक्ष मधुसुधन मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सोनिया गांधी यांनी प्रियंका गांधी- वधेरा यांच्यासह दिल्लीमध्ये एआयसीसीच्या मुख्यालयात मतदान केले. तर उमेदवार मल्लिकार्जून खर्गे यांनी बेंगलूरमध्ये आणि शशी थरूर यांनी तिरूवनंतपूरममध्ये मतदान केले.
Previous Articleमाझे मंत्रीपद हे इथल्या मातीचा सन्मान – आ. विश्वजित कदम
Next Article उटगी जवळ अपघात दोन दुचाकी जळून खाक








