सांगली
पुण्यात सुरु असलेल्या डॉ. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाला सांगलीतून पाठींबा दर्शविण्यात आला आहे. सांगलीतील पुरोगामी संघटांनानी हा पाठींबा दिला आहे. विधानसभा निवडणूकमध्ये महायुती अभूतपूर्व यश मिळाले. या यशामागे ईव्हीएमचा हात असल्याचाही दावा समाजातून अनेक स्तरातून होत आहे. याच पार्शभूमीवर डॉ. बाबा आढाव यांनी तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषण केले आहे.
“सत्ता-संपत्ती- जात-धर्मांधतेच्या जोरावर दर दिवशी लोकशाहीचे होणारे वस्त्रहरण याच्या निषेधार्थ आणि संविधानातील विचार व मुल्यांच्या संरक्षणासाठी” पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे २८ नोव्हेंबरपासून तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषण सुरु आहे. ९४ वर्षीय योद्ध्याला राज्यातून विविध ठिकाणहून पाठींबा दिला जात आहे.








