लंडन
ब्रिटनमध्ये 92 वर्षीय वृद्ध रायलँड हेडलीला एका महिलेवर बलात्कार अन् हत्येच्या 58 वर्षे जुन्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. ब्रिटनमधील हा सर्वाधिक काळ चाललेला खटला असल्याचे मानले जात आहे, याप्रकरणी न्यायालयाने 58 वर्षांनी निर्णय दिला आहे. हेडलीने 1967 साली लुईसा डन या महिलेवर तिच्याच घरात हल्ला केला होता. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. तर मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले हेते.









