15 हजार फुटांवरून घेतली उडी : नर्सिंग होमसाठी निधी जमविण्याचा हेतू
ब्रिटनच्या नॉर्थ यॉर्कशायरमध्ये राहणाऱया 90 वर्षीय प्रँक वार्ड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते 15 हजार फुटांवरून उड्डाण करत असलेल्या विमानातून उडी घेत असल्याचे दिसून येते. प्रँक पेशाने स्ट्टंमॅन नाहीत, परंतु त्यांनी एका चांगल्या उद्देशाने हे साहस करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर त्यांच्या या निर्धाराचे कौतुक केले जात आहे.
फ्रँक वार्ड यांनी स्वतःच्या पत्नीच्या नर्सिंग होमसाठी स्कायडायव्हिंग केले आहे. प्रँकच्या पत्नी मार्गारेट एक नर्सिंग होम चालवितात, तेथे व्हीलचेअरची कमतरता असल्याने रुग्णांना मोठा त्रास होतो. एकेदिवशी नर्सिंग होममध्ये गेल्यावर प्रँक यांना या समस्येची जाणीव झाली होती.
प्रँक यांनी लोकांच्या मदतीने व्हीलचेअर खरेदी करण्याचा विचार केला. मग प्रँक यांनी हा स्टंट करण्याचा निर्णय घेतला. यामुळे अधिक लोकांचे लक्ष वेधले जाऊ शकते, तसेच आम्ही नर्सिंग होमसाठी लवकर व्हीलचेअर खरेदी करू शकू असे त्यांचे म्हणणे आहे. आता प्रँक यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोकांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून आतापर्यंत 1958 डॉलर्सचा निधी जमा झाला आहे.
स्कायडायव्हिंगनंतर प्रँक जमिनीवर उतरल्यावर त्यांची प्रतिक्रिया पाहण्याजोगी होती. तुम्हाला कसे वाटतेय असे विचारण्यात आले असता प्रँक यांनी मी काहीच ऐकू शकत नसल्याचे म्हणत वयाच्या 95 व्या वर्षी हे मी करू शकेन असे वाटत नसल्याचे उत्तर दिले होते.