डिचोली वाहतूक पोलिसांची 13399 जणांवर कारवाई : सहा महिन्यातील आकडेवारी
डिचोली : वाहतुकीचे नियम अधिक कडक असतानाही अनेक वाहनचालकांकडून बेफिकीरपणा केला जात आहे. डिचोली वाहतूक पोलीस निरीक्षक गौरीश मळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाने ते जून 2023 पर्यंत एकूण 13399 जणांवर विविध कारणासाठी दंडात्मक कारवाई केली आहे. त्यातून सुमारे 90 लाख ऊपये महसूल गोळा झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्याक, गेल्यावषी 2022 मध्ये संपूर्ण वर्षात एकूण 35503 जणांवर वेगवेगळ्या कारणासाठी तालाव देण्याची कारवाई झाली त्यातून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला होता. डिचोली बाजारात पे पार्किंगची व्यवस्था करण्याची घोषणा झाली. मात्र अनेक वेळा पाहणी व नियोजन करूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. बाजारातील काही गाळे हटवले. तरी अजून काही तसेच असल्याने पार्किंगला जागा मोकळा करण्यात आलेला नाही. त्यामुळे डिचोलीत पार्किंग समस्या जटिल बनत आहे. नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी लवकरच या संदर्भात निर्णय होईल व पे पार्किंगची सुविधा देण्यात येईल असे सांगितले. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी पार्किंग समस्येवर तोडगा काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यादृष्टीने चाचपणी अंतिम टप्यात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान येथील शांतादुर्गा सर्कलजवळ सकाळी व दुपारी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. विद्यार्थी पालक यांची मोठी गर्दी होते, त्यामुळे याठिकाणी तातडीने झेब्रा क्रॉसिंग करण्याची वाढती मागणी आहे. त्यादृष्टीने तातडीने प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना केल्या जात आहेत.









