किंगडाओ शहराच्या पूर्ण 90 लाख लोकसंख्येची चाचणी करण्याची योजना चीनने आखली आहे. या चाचण्या केवळ 5 दिवसांत करण्यात येणार आहेत. अलिकडेच किंगडाओमध्ये विषाणूचा फैलाव झाल्याची बाब समोर आली होती. किंगडाओमध्ये रविवारी 6 नवे रुग्ण सापडले होते. तेव्हापासून आतापर्यंत 1 लाख 40 हजार जणांची चाचणी करण्यात आली आहे. चीनने 3 दिवसांमध्ये या शहरातील 5 जिल्हय़ांमधील सर्व लोकांची चाचणी करण्याची योजना आखली आहे. सध्या चीनमध्ये संसर्ग नियंत्रणात आहे. देशात आतापर्यंत 85 हजार 578 रुग्ण सापडले आहेत.
असून 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे.









