सायन्स जर्नल एसीसी पब्लिकेशन्समध्ये प्रकाशित एका अध्ययनाने सर्वांनाच चकित केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ व्हिक्टोरियाच्या वैज्ञानिकांनी दरवर्षी माणूस प्लास्टिक शरीरात सामावून घेत असल्याचे दाखवून दिले आहे. ह्युमन कन्जंप्शन मायक्रोप्लास्टिकनुसार प्रौढ व्यक्ती दरवर्षी 39 ते 55 हजार प्लास्टिकचे तुकडे गिळतोय किंवा श्वसनाद्वारे शरीरात घेत आहे.
अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी मानवी नसांमध्ये मायक्रोप्लास्टिकच्या अस्तित्वाचा शोध लावला आहे. यात प्रत्येक ग्रॅम ऊतीमध्ये मायक्रोप्लास्टिकचे सुमारे 15 कण आढळून आले आहेत. अशाप्रकारे दर आठवड्याला माणूस एक क्रेडिट कार्ड इतके प्लास्टिक शरीरात आणत असल्याचे मानले जाते आहे. हे प्लास्टिक नसांच्या वाटे हृदय आणि मेंदूपर्यंत पोहोचत आहे.

अमेरिकन केमिकल सोसायटीने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात एका पायलट स्टडीचे निष्कर्ष जाहीर केले, ज्यात प्लास्टिक हृदयात पोहोचून काय करते यावर भर देण्यात आला होता. याकरता 15 लोकांना अध्ययनात सामील करण्यात आले, ज्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. लेझर डायरेक्ट इन्फ्रारेड इमेजिंग सिस्टीमच्या मदतीने हृदयाच्या ऊतींचा अभ्यास करण्यात आला. प्रत्येक पेशीत 9 प्रकारचे मायक्रोप्लास्टिक होते असे यादरम्यान आढळून आले. यात सर्वात मोठा तुकडा सुमारे 469 मिलिमीटरचा होता. हे अध्ययन इन्व्हॉयरनमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहे.
उंदरांवर करण्यात आले अध्ययन
युनिव्हर्सिटी ऑफ रोड आयलँडच्या प्राध्यापिका जैमी रॉस यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांनी मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या प्लास्टिकवर संशोधन केले आहे. तसेच अशाप्रकारे अवयवांमध्ये प्लास्टिक जमा झाल्याने शरीरावर कोणता प्रभाव पडतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याकरता युवा आणि वृद्ध उंदरांवर प्रयोग करण्यात आला. सलग 3 आठवड्यांपर्यंत त्यांना पाणी आणि खाण्यात प्लास्टिकचे बारीक-बारीक तुकडे टाकून देण्यात आले. यादरम्यान वृद्ध उंदरांना विसर पडू लागला होता आणि ते अधिक चिडचिडे झाले होते. केवळ 3 आठवड्यांमध्ये हे बदल वैज्ञानिकांनाही चकित करणारे होते. अनेक कमजोर उंदरांमध्ये अल्झायमर्सची लक्षणे दिसून आली होती. प्लास्टिकच्या अस्तित्वामुळे मेंदूत मिळणारे ग्लियर फायब्रिलरी अॅसिडीक प्रोटीन (जीएफएपी) देखील घटू लागते. हे प्रोटीन मेंदूच्या हालचाली म्हणजेच भावना आण निर्णय घेण्याच्या क्षमतेशी निगडित आहे. अशा स्थितीत या प्रोटीनची कमतरता या क्षमतांवर थेट प्रभाव पाडते.
ब्रेन-ब्लडर बॅरियर तुटतेय
शरीरातील प्लास्टिक वृद्ध लोक किंवा कमकुवत प्रतिकारक्षमता असलेल्या लोकांवर अधिक वेगाने प्रभाव पाडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्वसन किंवा अन्नाद्वारे पोहोचणारे हे मायक्रोप्लास्टिक ब्रेन-ब्लड बॅरियरपर्यंत नुकसान पोहोचविते. ब्रेन-ब्लड बॅरियर एक प्रकारचे प्रोटेक्टिव्ह लेयर असून ते कुठल्याही बर्हिगत घटकाला मेंदूपर्यंत पोहोचण्यापासून रोखते. याला भेदणे सर्वसाधारपणे अत्यंत अवघड आहे, परंतु प्लास्टिक या वॉलला देखील संपुष्टात आणत आहे.









